Take a fresh look at your lifestyle.

तहसीलकडे जाणारा रस्ता दुरूस्त करा ; सेलूकरांची मागणी

सेलू (डाॅ विलास मोरे) :- शहरातील लक्कडकोटपासून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सेलूतील सुजाण नागरिकांनी दिला आहे.

शहरातील अत्रे नगर परिसरात उभारलाल्या प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, दस्त नोंदणी कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालयासह शासकीय मागासवर्गीय मुलां-मुलींचे वसतिगृह आहेत. याच रोडवर शहरातील मुख्य स्मशानभूमी आहे. अत्रे नगर व गायत्री नगर येथील रहिवासी नागरीकांनाही रहदारीसाठी हाच रस्ता आहे. लक्कडकोटपासून कार्यालयाकडे जाणारा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

तालुक्यातील प्रमुख कार्यालयाकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त असते. पुर्वी हा रस्ता सिमेंट ने बनवलेला होता. आता हा रस्ता पुर्णतः उखडला आहे. रस्त्याच्या आतील लोखंडी गज बाहेर पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक दुचाकीस्वार अपघात होऊन जखमी झाले आहेत. शहरातील सुज्ञ नागरीकांनी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी सुचना देऊनही काहीच उपयोग होत नाही. तहसीलकडे जाणारा रस्ता दुरूस्त केला नाही तर सेलूकर आंदोलन करणार आहेत.

Comments are closed.