Take a fresh look at your lifestyle.

सेलू पोलीसांनी १० हजाराची अवैध दारू केली जप्त; एकास अटक

सेलू :-  सेलू पोलीसांनी कारवाई करत ९ हजार ९० रुपयांची अवैध देशी-विदेशी दारू जप्त केली असून हा गोरख धंदा करणारा रमेश अर्जुन तोडे यास शुक्रवारी सेलू पोलीसांनी अटक केली आहे.

या घटनेची माहिती अशी की, शहरातील पाथरी रोडवर परिसरात रमेश तोडे हा इसम स्वतःच्या राहत्या घरी अवैध मार्गाने बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारू विक्री करत असल्याची खबर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करणेकामी नियुक्त केलेल्या पथक पाथरी रोड परिसरात गेले. येथे रमेश अर्जुन तोडे हा त्याच्या घराशेजारी देशी व विदेशी दारू विक्री करत असल्याचे सेलू पोलिसांच्या पथकाला दिसले. लगेच पोलिसांनी छापा टाकला. यात एकूण ९ हजार ९० रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.