Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यातील बहुतांश खेडेगावात घाणीचे साम्राज्य

गाव पुढाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे स्वच्छता मोहिमेला हरताळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

सेलू (डाॅ विलास मोरे) : ग्रामीण भागातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याकरिता शासनाने निर्मल भारत मोहीम व स्वच्छता अभियान सुरू केले आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींची स्वच्छता मोहिमेची गती मंदावली असून अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. गाव पुढाऱ्यांनी याकडे लक्ष दिले तरच स्वच्छता मोहिमेचा उद्देश सफल होईल असे बोलले जात आहे.

परिसरातील अनेक गावांत पाय ठेवताच सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते. गावखेड्यातील अनेक नागरिक आजही शौचालयाचा वापर करीत नाही. गावातील मुख्य रस्त्यावर शेणखताचे ढिगारे आहेत. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने स्वच्छतेसाठी यापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त गाव व आता स्वच्छ भारत मिशन अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यच नव्हे तर राज्यातील सर्व गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प ही लवकरच पूर्णत्वास जाणार आल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागातील उघड्यायावरील प्रातविधीची पद्धत पूर्णपणे बंद करण्यासाठी शौचालय बांधकामावर जोर दिला जात असून प्रत्येक कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम करून घेतले. मात्र शौचालयांचा अनेक कुटुंब वापर करीत नाही. ही योजना पारदर्शक पद्धतीने राबविल्यास गावाचा परिसर स्वच्छ ठेऊन आरोग्य सुद्धा अबाधित ठेवता येऊ शकते. असा उद्देश शासनाचा असला तरी सेलू तालुक्यात हे अभियान
मंदावल्याचे दिसून येत आहे. संबंधित शासकीय यंत्रणेने याची दखल घेऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

@ “ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत व 15 वित्त आयोग अंतर्गत लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला येतो मात्र हा निधी नेमका जातो कुठे ? याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.”

Comments are closed.