Take a fresh look at your lifestyle.

सेलूतील शिवाजी नगरात ७७ किलो गांजा जप्त ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात

अवैध धंदे शोध पथक व सेलू पोलीसांनी रविवारी ता. १३ मार्च रोजी सेलू शहरातील शिवाजी नगर भागात टाकलेल्या एका धाडीत ७७ किलो गांजा जप्त केला असून ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिली.

सेलू शहरातील शिवाजी नगर येथे अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ७७ किलो गांजा साठवून ठेवला असल्याची खबर पोलीसांना लागताच परभणी पोलीसांचे अवैध धंदे शोध पथक व सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या पथकाने रविवारी सकाळी साडे आकरा वाजता शिवाजी नगर येथे धाड टाकून ७७ किलो गांजासह ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी शेख अकबर शेख रजाक (वय 21 वर्ष), आक्रम आयुब पठाण (वय 21 वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर जावेद बागवान रा.परतूर हा आरोपी फरार आहे. दरम्यान पोलीस हवालदार भारत नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरूद्ध गु.र.न.105/22कलम 8(क)20(ब)2(क)29 गुंगिकारक औषधी व मनोव्यापार परिणाम करनारे पदार्थ अधिनीयम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, नायब तहसिलदार प्रशांत थारकर, अमलदार जावेद खाॕ, सुनील राठोड, रामकिसन काळे, अरुण कांबळे, अझर पटेल, सय्यद जाकेर, एस.एम. राठोड यांचा सहभाग होता.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.