सेलू (डाॅ विलास मोरे) :- दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेलू नगर परिषदेच्या वतीने गुरूवारी ता २७ ऑक्टोबर रोजी साई नाट्यगृहात घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणावर दिसून आली.
मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, अशोक कासार, नगरसेविका कमल झमकडे, उषा दौड, शोभा कोरडे, अन्नपूर्णा शेरे, नगरसेवक रहिम पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, प्रकल्प अधिकारी शितल सोंळके आदींची उपस्थिती होती. मेळाव्यात शहरातील विविध क्षेत्रातील महिला व बचत गटातील महिला सदस्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले होते. या मेळाव्याला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…..
Comments are closed.