Take a fresh look at your lifestyle.

सेलू नगर पालिका स्वच्छता अभियानात राज्यात दुसरी

दिल्ली येथे विज्ञान भवनात पुरस्कार प्रदान ! फटाके फोडून सेलूत आनंदोत्सव

सेलू (डाॅ विलास मोरे) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पश्चिम झोन मधून सेलू नगर पालिकेने देशात २० वा तर राज्यातून दूसरा क्रमांक पटकावला आहे. शनिवारी ता. २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्या नंतर सेलूकरांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

केंद्र सरकारच्या वतीने देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सेलू नगरपालिकेने सक्रिय सहभाग घेतला होता. या अभियानात नमूद केलेल्या निकषाप्रमाणे पालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानात सेलूकरांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. नगराध्यक्ष विनोद बोराडे व त्यांची टीम तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी व इतर कर्मचारी यांच्यासह सेलूकरांनी स्वच्छतेबाबत घेतलेल्या परिश्रमाला मोठे यश आले आहे. म्हणूनच नगरपालिकेने पश्चिम झोनमधून २० वा क्रमांक पटकावला. या झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा व  राजस्थान या पाच राज्याचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रात दुसरा क्रमांक नगरपालिकेचा आल्यामुळे सेलूकरांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

शनिवारी दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात नागरी ग्रहनिर्माण आणि शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्ष विनोद बोराडे व मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला दिल्लीहून रविवारी नगराध्यक्ष विनोद बोराडे सेलू येथे पोहोचताच सेलूकरांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. नगर पालिकेला मिळालेला मान व पुरस्कार हा सर्व कर्मचारी, सफाई कामगार व सेलूकरांनी केलेल्या परिश्रमाचे यश आहे. अशा भावना नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Comments are closed.