Take a fresh look at your lifestyle.

मुलांच्या लसीकरणाला सेलूत अल्प प्रतिसाद पहिल्या दिवशी केवळ ७२ मुलांनी घेतली लस

सेलू :- ओमायक्राॅनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने देशभरात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सोमवारपासून सुरूवात केली. सेलू शहरात पहिल्याच दिवशी केवळ ७२ मुलांनी लस घेतली असल्याने लसीकरणाला अल्प प्रतिसाद दिसून आला.

ओमायक्राॅनचा धोका वाढू नये म्हणून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने लसीकरण करण्यासाठी प्रभावी अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने शहरातील विविध भागात लसीकरण केंद्राची सोय केली आहे. मात्र लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद पहायला मिळाला. घरोघरी जाऊन या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार केला तर प्रतिसाद वाढू शकतो. असे एका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले. एकंदरीत लसीकरणाला सरकारी यंत्रणेसह नागरीकही उदासीन असल्याचे दिसत आहे. फक्त वरिष्ठांचा आदेश आहे म्हणून कर्तव्याचा आव आणणे याला काही महत्व नसते तर राष्ट्रसेवा म्हणून लसीकरण मोहीमेकडे पाहणे गरजेचे आहे. ओमायक्राॅनचा संभाव्य धोका टाळायचा असेल तर लसीकरण मोहीमेला गती येणे आवश्यक आहे.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.