रविवारी ता. १३ मार्च २०२२ रोजी ईगल फाऊंडेशन सेलूच्या वतीने बेल्ट एक्झामिनेशन व बेल्ट वितरण सोहळा पारिजात काॅलनी येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे पार पडला.
कार्यक्रमा करिता विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डाॅ विलास मोरे, डाॅ बाळासाहेब जाधव, डाॅ कैलास औटे, डाॅ अरविंद बोराडे, डाॅ ॠतूराज साडेगावकर, विजय हिरे, सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अब्दुल सत्तार अन्सारी तर प्रा काशिनाथ पल्लेवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ६० विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यात माहेश्वरी दळवे, मिम खातून, ओंकार घुले, यश थोरात, निशा कार्लेकर, समीर पठाण या विद्यार्थ्यांना ब्राऊन बेल्ट तर इतर विद्यार्थ्यांना विविध बेल्ट वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत भोगावकर, शेख अलीम, ऋतूजा सापकाळे, मैनोद्दीन शेख, रितेश आठवे, शहारूख शेख आदींनी परिश्रम घेतले. खेल्या १५ वर्षापासून ईगल फाऊंडेशनच्या माध्यमातून सेलू शहरातील मुला, मुलींना आत्मरक्षणाचे कराटे प्रशिक्षण देत आहे. करिता प्रशिक्षक फिरोज पठाण मास्टर यांचा सर्व स्तरातून गुणगौरव करण्यात येत आहे हे विशेष….
Comments are closed.