Take a fresh look at your lifestyle.

सेलूत कापूस खरेदीला सुरूवात कापसाला ६ हजार २०० रू.भाव

सेलू (डाॅ विलास मोरे) :- सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पाथरी रोडवरील ग्लोबल जिनिंग येथे शनिवारी ता ९ ऑक्टोबर रोजी नवीन कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे.

यावेळी भरत बाबुराव नागवे या शेतकऱ्याचा प्रथम कापूस खरेदी करण्यात आला. त्यांच्या कापसाला प्रती क्विंटल ६ हजार २७४ भाव मिळाला. बाजार समिती व व्यापारी बंधूंच्या वतीने सदर शेतकऱ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, सचिव राजीव वाघ, ब्रिजगोपाल काबरा, राठी मामा, गणेश अग्रवाल, निखिल अग्रवाल, अनीस शेख, सादीक शेख आदींची उपस्थिती होती…

Comments are closed.