Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यात गुटखा विक्रीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन यशस्वी

लोकपत्रच्या बातमीची घेतली दखल पोलीस निरीक्षक गाडेवाढ यांची दबंग कामगिरी

सेलू (डाॅ विलास मोरे) :- राज्यात गुटखा बंदी असताना सेलू शहर व तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री होत असल्याची बातमी दैनिक लोकपत्रच्या दि. १४ ऑक्टोबर रोजीच्या अंकात प्रकाशित होताच सेलू येथे नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली असून गुटखा विक्री व पुरवठा करणाऱ्या दलालांना चांगलाच चाप लावला आहे. परिणामी शहरातील गुटखा विक्रीवर काही अंशी तरी आळा घालण्यात पोलीस प्रशासन यशस्वी झाले आहे.

राज्य शासनाने राज्यात गुटखा उत्पादन व विक्री करण्यास बंदी घातली असताना सेलूत मात्र राजरोसपणे गुटखा विक्री होते. एवढेच नाहीतर सेलू येथील सहा ते सात एजंट तालुक्यातील ग्रामीण भागातसह जालना जिल्ह्यातही सातोना, परतूर, आष्टी या भागात गुटखा पुरवठा करतात. पाथरी व आष्टी मार्गे सेलूत रात्री किंवा पहाटेच्या वेळी खाजगी वाहनाने गुटखा दाखल होतो. या गोरखधंद्यात दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड सामील आहेत.

सेलू तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री या मथळ्याखाली दैनिक लोकपत्रने बातमी प्रसिद्ध करताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी गांभीर्याने दखल घेत शहरातील गुटखा विक्री करणारे व पुरवठा करणारे यांची पोलीस ठाण्यात तातडीने एक बैठक घेऊन गुटखा विक्री करणे बंद करण्यास सांगितले. सुरूवातीला मी समज देत आहे. गुटखा विक्री करताना जर कोणी दिसला तर  कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. तेंव्हापासून गुटखा विक्री करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परिणामी शहरात काही अंशी गुटखा विक्रीला आळा बसला असला तरी शहरातील काही पानटपरीवाले पोलीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत तर काही निगरगट्ट पानटपरीवाले चोरीछूपे गुटखा विक्री करत आहेत. लातों के भुत बातों से नही मानते. या उक्तीप्रमाने पोलीसांना अजून कठोर पावले उचलावी लागणार आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या शिस्तबद्ध व दबंग कामगिरीमुळे सामान्य सेलूकर समाधान व्यक्त करत आहेत.

Comments are closed.