Take a fresh look at your lifestyle.

सेलूतील गुलमोहर काॅलनीत सशस्त्र दरोडा महिलांसह लहान मुलांना मारहाण

सहा लाखाचा ऐवज लुटला | पंधरा दिवसात पाचवी घरफोडी | शहरात दहशतीचे वातावरण

सेलू (डाॅ विलास मोरे) : शहरातील गुलमोहर कॉलनी येथील रहिवासी शेख सिद्दिक शेख मोईन बागवान याच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून मारहाण करत ६ लाख रूपयाचा ऐवज लुटून नेल्याचे घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याघटनेची माहिती अशी आहे की, सिद्दिक बागवान हे आपल्या भावा शह गुलमोहोर कॉलोनी येथे राहतात. घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना गुरूवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शस्त्रधारी ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी छतावरील जिन्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर आतील सर्व खोल्यांची बाहेरून कडी लावली. दरम्यान एका खोलीत प्रवेश करीत चोरट्याने झोपलेल्या महिलांना चाकू व तलवारीचा धाक दाखवत अंगावरील व घरातील ५ लाख किमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख रोख असा ६ लाखाचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केले.

काहींनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण समोरील लोया याच्या शेताततुन चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरक्षक रावसाहेब गाडेवाड आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा केला. चोरट्यांजवळ तलवार, गुप्ती, चाकू, गज असे धारदार शस्त्रे होती. घटने दरम्यान चोरट्यांनी लहान मुले , महिलासह सर्वांना मारहाण केली.

यात सिद्दीकी बागवान याचे दात पडले तर रजिया बेगम याच्या नाकाला जखम झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात पाचवी घरफोडी असून एकाही घटनेतील आरोपी अजून पोलीसांच्या हाती लागले नाही. या प्रकरणी सिद्दीकी बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. पोलीस अधिक्षकांनी याबाबीचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे.

Comments are closed.