सेलू (डाॅ विलास मोरे) : सेलू येथील विवेकानंद नगरातील एका घरात २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खिडकीची लोखंडी जाळी तोडून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने व रोक रक्कम असा १ लाख ८३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ता. २५ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती अशी आहे की, सेलू शहरातील विवेकानंद नागरातील रहिवाशी भारती पुंजाराम शेवाळे यांच्या राहत्या घरी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खिडकीची लोखंडी जाळी तोडून घरात प्रवेश करून १ लाख ८० हजार ५०० रूपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख ३ हजार. असा १ लाख ८३ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ता. २५ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी भारती शेवाळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरूद्ध कलम 457,380 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री अनमोल करत आहेत.
Comments are closed.