Take a fresh look at your lifestyle.

ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षपदी सतीश जाधव तर सचिवपदी मंजुषा कुलकर्णी

सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू तालुक्याच्या अध्यक्षपदी सतीश जाधव यांची तर सचिवपदी मंजुषा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी दिले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने संपूर्ण देशात 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सेलू येथे रविवारी सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुकाध्यक्षपदी सतीश जाधव तर मंजुषा कुलकर्णी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती झाल्याबद्दल डाॅ विलास मोरे, सेलूभुषन जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, जेष्ठ समाजसेवक किशोर जोशी, गंगाधर कान्हेकर, अशोक कोपुलवार, विठ्ठल गजमल, सिद्धार्थ गायकवाड, श्रीपाद रोडगे, लक्ष्मी मेहता, ओमप्रकाश मेहता, जयचंद खोना, पुनमचंद खोना, गणेश थोरात, राजू चव्हाण, आकाश जाधव, अश्विनी घोगरे, नागोराव देशमुख, अरूण आढे, प्रकाश डहाळे आदींनी अभिनंदन केले.

Comments are closed.