Take a fresh look at your lifestyle.

संजय राठोड यांनी फेटाळले सर्व आरोप; मात्र चित्रा वाघ त्यांच्यावर भडकल्या, म्हणाल्या…

पुणे: माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार यांच्यावर एका महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. महिलेने पत्राद्वारे यवतमाळ पोलिसात तक्रार केली. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विटरवर माहिती दिली होती.

संजय राठोड यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी मीडियावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले मीडिया काहीही खात्री न करता टीआरपी साठी अशा बातम्या चालवत आहे. मात्र, यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या पीडित महिलेनी केलेली तक्रार संजय राठोड यांना टीआरपीचा विषय वाटत आहे का? हा सत्तेचा माज नाही तर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महिलेचा जबाब अजूनही नोंदवण्यात आला नाही

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्या म्हणाल्या, “ यवतमाळ येथील महिलेने संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच यवतमाळच्या एसपींनीही तक्रार आल्याचं मान्य केलं आहे.  पण पोलिस अजूनही त्या महिलेचा जबाब नोंदवत नाहीत. तसेच तिची कोणी विचारणाही केली नाही.”

हा सत्तेचा माज आहे.

पीडित महिलेने तिच्या पतीला नोकरीवर ठेवण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करत संजय राठोड यांनी मानसिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलय. या गोष्टीला माजी मंत्री राठोड टीआरपी साठीची बातमी आहे असं म्हणत आहेत. ही कसली मग्रुरी आहे आणि हा सत्तेचा माज असल्याचं ही चित्रा वाघ म्हणाल्या.

Comments are closed.