धक्कादायक….संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली माहिती
यवतमाळ: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आधीच अडचणीत असलेले महविकास आघाडीचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात यवतमाळ पोलिसांत पोस्टाने तक्रार करण्यात आली. या तक्रारीत एका महिलेने संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप लावला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
चित्रा वाघ यांनी केले ट्विट
चित्रा वाघ यांनी ट्विटर वर ट्विट करत लिहिले की, ‘शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय’ चित्रा वाघ यांनी तक्रारीची फोटोहो सोबत जोडला आहे.
शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय pic.twitter.com/4ZFQU6NGHt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 12, 2021
काय आहे संजय राठोड यांचे जुने प्रकरण?
या अगोदर पुण्यात 7 फेब्रुवारी रोजी एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मुलीचे नाव पूजा चव्हाण होते. ती एक टिकटॉक स्टार होती आणि तिचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत चांगले संबंध होते, असे सांगण्यात येते. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तिचे संजय राठोड यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले असा आरोप आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येस संजय राठोड जबाबदार असल्याचे विरोधकांनी रान पेटवले होते. तसेच यादरम्यान संजय राठोड नॉट रिचेबल झाले होते, त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
द्यावा लागला राजीनामा
घटनेच्या काही दिवसांनंतर संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणात त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र विरोधी पक्षांनी त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संजय राठोड याणू 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता.
Comments are closed.