Take a fresh look at your lifestyle.

सेलूत सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन….

सेलू (डाॅ विलास मोरे) :- परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ॠण निर्देश व सर्व पक्षीय नेत्यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर पालिकेच्या वतीने शनिवारी ता. २५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सेलू शहरातील साई नाट्यगृहात करण्यात आले आहे.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऊभारलेल्या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी योगदान दिले. या आंदोलनाला यश मिळाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्याबद्दल त्यांचे ॠण व्यक्त करून आंदोलनात योगदान दिलेल्या सर्व पक्षीय नेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने असनार आहेत. स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष विनोद बोराडे तर कार्याध्यक्षपदी साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर असणार आहेत. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे यांचा नागरी सत्कार होणार आहे. अशी माहिती आयोजकाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Comments are closed.