Take a fresh look at your lifestyle.

क्रीडांगणासाठी कृषी विद्यापीठात जागा मिळणार कृषीमंत्र्यांनी दिली मंजुरी ; बैठकीला खासदार आमदार यांची उपस्थिती

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठी खासदार संजय जाधव हे प्रयत्नशील होते. परंतु जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यासाठी कृषी विद्यापीठातील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. कृषी मंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी (दि.5) दिली.

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठी खासदार संजय जाधव हे प्रयत्नशील होते. परंतु जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यासाठी कृषी विद्यापीठातील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. या संदर्भात मंगळवारी (दि. पाच) मुंबईत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात यासंबंधी बैठक घेण्यात आली.

या वेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत खासदार संजय जाधव यांनी क्रीडा संकुलाचा प्रश्न मांडला, त्यावर विद्यापीठातील एकूण दहा एक्कर जागा देण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी तत्वतः मंजुरी दिली. या या बैठकीस राज्याचे कृषी सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कुलसचिव यांच्यासह इतर अधिकारी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उपस्थिती होती.

Comments are closed.