Take a fresh look at your lifestyle.

खासदार संजय जाधव यांची लाडू तूला…

सेलू (डाॅ विलास मोरे) :- राज्य सरकारकडे पाठपुरावा करून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परभणी येथे लाडू तुला करण्यात आली.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऊभारलेल्या सर्व पक्षीय आंदोलनाला यश मिळाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्याबद्दल सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परभणी येथे त्यांची लाडू तूला करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे, विठ्ठल महाराज कारके, दत्ता झोल, मुंजाभाऊ कोल्हे, प्रभाकर वाघीकर, माणिक अप्पा घुमरे, रंगनाथ वाकणकर, अरुण ताठे, जिजाभाऊ सोळंके, गोविंदराव सोळंके, अतुल डख, बाबा भाबट, पवन घुमरे, एकनाथ सोळंके, अनिल रोडगे, कृष्णा तिडके आदींची उपस्थिती होती…

Comments are closed.