Take a fresh look at your lifestyle.

आयटी पार्कमध्ये रोजगार मिळत असल्याचे काहिंना पाहवत नाही : आमदार संग्राम जगताप

नगर, : आयटी पार्क सुरू करण्यासाठी मी 2016 पासून प्रयत्नशील होतो. नगरचेच असलेले पण पुणे व अन्य ठिकाणी स्टार्टअप सुरू करणार असलेल्यांना नगरमध्ये निमंत्रित केले. या निमित्ताने तेथे नगरच्या युवकांना रोजगार मिळाला. मात्र नगरमधील काहींना हेच पावहत नाही. त्यामुळे त्यांनी बिनकामाचा खटाटोप चावलला आहे असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळे यांच नाव न घेता केला. आयटी पार्कची इमारत म्हणजे ते काय पक्षाचे कार्यालय वाटले काय असा चिमटा आमदार जगताप यांनी काढला.

नगर शहरात आमदार संग्राम जगताप व काॅंग्रसेच नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. काळे यांच्यावर काल (गुरुवारी) एमआयडीसी भागातीलल आयटी पार्क इमारतीत जाऊन गोंधळ घालत महिलेचा हात धरल्याच्या कारणावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आज (शुक्रवारी) किरण काळे यांनी याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेउ आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, मी पाच वर्षापासून नगर येथील आयटी पार्क सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.

त्याआधी ही इमारत 19 वर्ष बंद होती. अथक प्रयत्नानंतर स्टार्टअप सुरू करणार्‍यांना तेथे येण्याचे निमंत्रण दिले. खासगी खर्चातून इमारतीची डागडुजी केली. इमारतीत उद्योग-व्यवसाय आणण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. आम्ही नगरच्या तरुणाईला काम मिळावे म्हणून प्रयत्न केले तर त्याचा त्रास आता काहींना होत आहे. आयटी पार्कची इमारत म्हणजे राजकीय व्यासपीठ किंवा पक्ष कार्यालय नाही. बदनामी करून सुरू असलेले काम बंद पाडण्याचे कारस्थान आहे. त्यापेक्षा आपले कर्तृत्त्व दाखवून चांगले व लोकोपयोगी कामे करावीत, काही लोक तेथे आलेल्यांना दहशत करत व तेथे आलेल्यांना पळवून लावण्याचे हे काम करत आहेत. मात्र असे करून कोणीही मते देत नसतात. त्यासाठी कर्तृत्त्व सिद्ध करावे लागते.

Comments are closed.