Take a fresh look at your lifestyle.

सेलूत संगीत महोत्सवाच्या पुर्व तयारीची बैठक संपन्न

सेलू : सेलू येथे होणाऱ्या संगीतरत्न पंडित हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाच्या पुर्व तयारीसाठी रविवारी ता. २८ नोव्हेंबर रोजी नुतन विद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य विनायकराव कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, गोविंद जोशी, श्रीकांत उमरीकर, मल्हारीकांत देशमुख, संतोष चारठाणकर, गिरीश लोढया आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या चार वर्षांपासून संगीतरत्न पंडित हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून देलेले निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करणे, मराठवाड्यातील कलाकारांना संधी द्यावी, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, तबला, सारंगी वाद्य असे कार्यक्रम घेण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. चार वर्षांपूर्वी सेलू मध्ये हा महोत्सव सुरू केल्यानंतर मराठवाड्यात २३ ठिकाणी हा महोत्सव सुरू झाला. हे सेलू शहरासाठी गौरवाची बाब आहे असे गौरवद्गार श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केले.
जन मानसात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होण्याचीसाठी वेळोवेळी असे संगीत महोत्सवाचे आयोजन केले जावे असे मत मल्हारीकांत देशमुख यांनी मांडले.
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत सेलू नगर पालिकेने देशात २० वा तर महाराष्ट्रात २ रा क्रमांक पटकावून थ्री स्टार पुरस्कार मिळविल्या बद्दल नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा संयोजन समिती व महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गंगाधर कान्हेकर यांनी केले तर पुजा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले….

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका