Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या सारखे नेत्यांचे धुने आम्ही धुणारे नाहीत…

नगर,ः नगर बाजार समिती सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. येत्या 29 तारखेला लेखा परिक्षण अहवालाचा निकाल आहे. त्यावेळी सर्व चित्र स्पष्ट होईलच, पण बाजार समितीला नोटीस आली की लगेच तुमचे नेते माजी आमदार शिवाजी कर्डील रात्रीतून उपमुख्यमंत्री अजित पवार पाया पडून आले. त्यामुळे चोरांनी आम्हाला निष्ठेबद्दल सांगू नये, तुमच्या सारखे नेत्यांचे धुणे धुणारे आम्ही नाहीत असा अरोप शिवसेना नेत व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पत्रकारपरिषदेत केला.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक वर्षापासून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांची सत्ता आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेत्यांनी काही दिवसापुर्वी केला. बाजार समितीला सहकार विभागाची नोटीस अाल्याचेही सांगितले. त्यावर संचालक मंडळाने आरोप खोडून काढत संदेश कार्ले व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला.

आज संदेश कार्ले यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य शरद झोगडे,  बाळासाहेब हराळ, तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष संपत म्हस्के, माजी सभापती रामदास भोर, रविंद्र भापकर, संदीप गुंड व इतर नेते उपस्थित होते. कार्ले म्हणाले, संचालक मंडळाने बाजार समितीत मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

जिल्हा परिषदेच्या  निवडणूकाडोळ्यासमोर ठेवून आमच्या बिनबुडाचे आरोप करता, 2016 ते 2018 या काळातील लेखापरिक्षणाबाबतचे आम्ही तक्रारदार आहोत. संचालक मंडळाचे नेते शिवाजी कर्डीले यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन पण मंडळाकडून लेखा परिणावर स्थगिती आणली होती. आम्ही निष्ठा शिकवू नये. आम्ही आदेश माणऩारे शिवसैनिक आहोत.

Comments are closed.