Take a fresh look at your lifestyle.

सेलूत शांतता समितीची बैठक संपन्न ! नियमांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळाला मिळणार बक्षिस

सेलू (डाॅ विलास मोरे):- सेलू तालुक्यात गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जातीय सलोखा कायम राहावा याकरिता  पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक गुरूवारी सायंकाळी ६ वाजता साई नाट्यगृहात घेण्यात आली.

यावेळी तहसीलदार बालाजी शेवाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांच्यासह नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच गणेशोत्सव सण साजरा करतांना गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

त्यामुळे नागरिकांनी सामूहिकरीत्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन गणपतीचे पूजन करू नये असे आवाहन केले. तसेच गणपती स्थापना संदर्भात सुध्दा शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहे. गणपती स्थापना व विसर्जन वेळी कोणतीही मिरवणूक काढण्यात येवू नये, सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती ४ फूट तसेच घरगुती गणेश मूर्ती २ फूट पेक्षा जास्त असू नये तसेच कुणीही डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करणार नाही व इतर महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्या. त्यामुळे पोळा व गणेशोत्सव सणाच्या निमित्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी  यावेळी केले…..

नियमांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळाला मिळणार बक्षिस

गणपती समोर इतर कोणत्याही प्रकारे मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात यावेत. यासाठी प्रशासनाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत. शहरीभागात प्रथम 5000, द्वितीय 4001, तृतीय 3001, चतुर्थ 2001 तर पाचवे 1001 व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर ग्रामीणभागासाठी प्रथम 5001, द्वितीय 3001, तृतीय 1001 व प्रमाणपत्र गणपती विसर्जनानंतर. दुसर्या दिवशी देण्यात येणार आहे. यावेळी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले…

Comments are closed.