सेलू : शहरातील पारीख काॅलनी येथे १८ वर्षीय शारदा कैलास कल्यानी या विद्यार्थीनीने ओढणीच्या साह्याने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १२ जानेवारी रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती या प्रमाणे शहरातील पारीख कॉलनी येथील शारदा कैलास कल्याणी (वय १८ वर्षे) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने बुधवारी १२ जानेवारी रोजी राहत्या घरी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तिचा ६ वर्षाचा भाऊ घरामध्ये सोबत होता. झालेल्या घटनेची शेजाऱ्यांना या मुलानेच माहिती दिली. दरम्यान काही तरुणांनी या तरूणीस प्रथम खाजगी व नंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचे निधन झाले. असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. मुलीचे वडील कैलास कल्याणी यांच्या डोळ्यावर याच दिवशी परभणी येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे मुलीची आई देखील त्यांच्यासोबत होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस नायक मधुकर जाधव, पोलीस नायक बालासाहेब लिंगायत यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी घटना स्थळावरून या तरुणीचा मृतदेह हलवण्यात आला होता. शारदा कल्याणी या विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्या नंतर विविध प्रश्न निर्माण झाले असून नेमके कारण मात्र पोलीस तपासानंतर उघड होईल…
डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.