सेलू : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त १२ डिसेंबर रोजी सेलू येथे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अभिष्ठचिंतन दिनाचे औचित्य साधून सेलू तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवारी सेलू येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन प्रेक्षा भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र लहाने, अशोक काकडे, रामराव उबाळे, एड बालासाहेब रोडगे, पूरूषोत्तम पावडे, आनंद डोईफोडे, नबाजी खेडेकर, कैलास मोगल, नगरसेवक रहीम पठाण, मजीद बागवाण, गौस लाला, आबा नायबळ, आशाताईं गायकवाड यांची उपस्थिति होती. सुत्रसंचलन परवेझ सौदागर तर सुधाकर रोकडे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रघूनाथ बागल, निर्मला लिपणे, विशाल देशमुख, प्रदिप ढवळे, सचिन शिंदे, पप्पु शिंदे, शिवराम कदम, आदींनी प्रयत्न केले.
पुर्ण…. डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.