Take a fresh look at your lifestyle.

साईबाबा नागरी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ! सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

सेलू (डाॅ विलास मोरे) :- येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्व साधारण सभा शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.

यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक पवन आडळकर, दत्तराव आंधळे, सुभाष चव्हाण, मिलींद सावंत, कांचन कोरडे, राजेंद्र आडळकर, शेख इम्रान यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी उपस्थित सभासदांसमोर सभेचे विषय कथन केले तर दत्तराव आंधळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने ९६.३६ लाखाचा नफा कमविला असून ३१ मार्च अखेर बँकेचे एकूण 16249.45 लाख ठेवी आहेत. कर्ज वाटप 8104.70 लाख असून सभासद संख्या 6427 आहे. बँकेचा स्वनिधी 1165.45 लाख आहे. परभणी जिल्हाभरात बँकेच्या 7 शाखा कार्यान्वित आहेत. सभासद व ग्राहक यांच्या विश्वासहार्तेमुळे सभासदांना सतत २५ वर्षापासून लाभांश देणारी जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक असल्याची ख्याती जिल्ह्यात निर्माण झाली असल्याची माहिती हेमंतराव आडळकर यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

सूत्रसंचलन व्यवस्थापक निसार पठाण यांनी केले तर आभार संतोष हुगे यांनी मानले. कोरोना प्रतिबंधक नियमानुसार सभासद व ग्राहकांची उपस्थित होती.

Comments are closed.