Take a fresh look at your lifestyle.

सहाव्या वर्षीही बँको पुरस्काराने साईबाबा बँक सन्मानित !

सेलू (डाॅ विलास मोरे) :- ठेवीसह इतर निकषांची पुर्तता विहित मुदतीत केल्याने सतत सहाव्या वर्षीही बँको समितीच्या वतीने सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला “बँको 2021” या पुरस्काराने सन्मानित केले.

बँकेच्या श्रेणी नुसार साईबाबा नागरी सहकारी बँकेने यावर्षी 100 ते 150 कोटी उद्दिष्ट पुर्ण केले. याची दखल घेत अविज पब्लिकेशन बँको समितीच्या वतीने बुधवारी ता. 1 सप्टेंबर रोजी म्हैसूर (कर्नाटक) येथे पुरस्कार सोहळा दरम्यान “बँको 2021” हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

हा पुरस्कार खासदार प्रताप सिम्हा, चीफ ऑडिटर अविनाश शितरे, ग्लेक्सी इंनमा, संचालक अशोक नाईक याच्या हस्ते देण्यात आला. यावेळी साईबाबा बँकेच्या वतीने संचालक पवनराजे आडळकर, बालचंदानी कन्हैयालाल, राजेंद्र आडळकर, गंगाधर आडळकर, शेख इम्रान, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांची उपस्थिती होती.

Comments are closed.