Take a fresh look at your lifestyle.

साईबाबा बँकेच्या वतीने ग्राहक, सभासदांचा सत्कार

सेलू :- सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांचा बुधवारी ता. २ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी सहा शाखा कार्यान्वित केल्या आहेत. सामाजिक हित, चोख व पारदर्शक व्यवहारामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासास पात ठरलेली बँक असा नाव लौकिक मिळवला आहे.

बँकेच्या २७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बँक प्रशासनाच्या वतीने बँकेचे ग्राहक व सभासदांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक पवन आडळकर, मुख्य कार्यकारी अधीकारी रामराव लाडाने, व्यवस्थापक अविनाश आडळकर, वसुली अधिकारी भास्कर आडळकर, नितीन आडळकर यांची उपस्थित होती.

२७ वर्षापुर्वी सेलू शहरात लावलेलं साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या रोपट्यानं आता वटवृक्षाचं रूप धारण कलं आहे. एका शाखेच्या जिल्हाभरात सहा शाखा झाल्या आहेत. या यशा मागे बँकेचे संचालक, कर्मचारी, ग्राहक व सभासद याचा मोठा वाटा आहे. असे मत बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केले.
डाॅ. विलास मोरे, सेलू

Comments are closed.