“मंदिरात पाण्याऐवजी वाइन द्या, डेअरी बंद करून काढा वायनरी”….संतापून सदाभाऊ खोतांनी लगावला असा टोला…!!
मित्रहो कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक बाबींवर परिणाम होत आहे, त्यामुळे सरकार सुद्धा अनेक निर्णय घेत आहे. नुकताच एक बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत किराणा दुकानासह सुपर मार्केट मध्ये देखील वाइन विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय अनेकांना चकित करत आहे, आता किराणा दुकानात सुद्धा वाइन मिळणार म्हणल्यावर लोक थक्क झाले आहेत.
विरोधकांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध सुरू केला आहे, भाजप, मनसे, एमआयएम यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. आता शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही बातमी ऐकून खोत साहेब भलतेच संतापले आहेत. सोशल मीडियावर त्यांची टीकास्त्र सर्वत्र चर्चेत आली आहेत.
त्यांनी “डेअरी बंद करून वायनरी काढा….” या शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच मंदिरात सुद्धा आता पाणी, तिर्थऐवजी वाइन द्या. गावातल्या डेअरी सुद्धा बंद करून टाका आणि मंत्रालयात वायनरी काढा. महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे, राज्यसरकारने साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाकावी तरच आम्ही समजेल की तुम्ही शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. असेही सदाभाऊ म्हणाले.
लालपरी सुद्धा वाचणार नाही, एसटी मधला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार अजून संपला नाही. दरम्यान वाइन विक्रीतून मिळणारा महसूल वाढवण्याच्या राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील किराणा दुकानात, सुपर मार्केट मध्ये देखील वाइन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. अनेकजण ठाकरे सरकारच्या निर्णयावर कमेन्ट करत आहेत.
जे सुपर मार्केट १ हजार स्क्वेअर फुटांवर आहेत तिथे एक स्टॉल टाकून वाइन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे. यावर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. तर मित्रहो तुमची या निर्णयावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.
Comments are closed.