Take a fresh look at your lifestyle.

मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझेला एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची मिळाली परवानगी

मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि निरीक्षक सुनील माने यांना ताब्यात घेण्याची मागणी करणारा अर्ज एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) न्यायालयाने सोमवारी फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत आर सित्रे यांनी ताब्यात घेण्याची मागणी करणारा एनआयएचा अर्ज फेटाळत, सचिन वाझे यांना स्वखर्चाने ओपन हार्ट सर्जरीसाठी खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली.

13 मार्च 2021 रोजी झाली होती अटक 

सचिन वाझे यांनी ओपन हार्ट सर्जरीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती, कारण सरकार संचालित जेजे हॉस्पिटल, जेथे त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार केले जात होते, तेथील डॉक्टरांनी सचिन वाझे यांच्या हृदयातील तीन ब्लॉकेज दूर करण्यासाठी तत्काळ ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर वाझे यांना 13 मार्च 2021 रोजी या प्रकरणात अटक झाली होती.

स्टॅन स्वामी सारखे कोठडीत मारण्याची इच्छा नाही…

सचिन वाझे यांनी कोर्टाला आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि पाद्री स्टेन स्वामी यांच्यासारखे कोठडीत मरण्याची इच्छा नसल्याचे सांगत खाजगी उपचारांना परवानगी देण्याची विनंती केली. एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी स्वामी यांचा 5 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाची वाट पाहत असताना कोठडीतच  मृत्यू झाला होता.

NIA  ला आणखी काही दिवसांची कोठडी हवी होती 

गेल्या शनिवारी याचिका दाखल करताना तपास एजन्सीने न्यायालयात मागणी केली होती की, सचिन वाझे यांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यात दोन आरोपी माजी पोलीस अधिकाऱ्यांची कोठडी द्यावी. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि इतर चार जणांच्या अटकेनंतर, एजन्सीला दोन गुन्ह्यांमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे आणि त्यांची चौकशी करण्याची गरज आहे, असा दावा NIA  ने केला होता. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि तळोजा कारागृहात आहे.

तपास एजन्सीने (NIA ) एजन्सीने सांगितले की, त्यांनी या प्रकरणात सचिन वाझेंच्या 28 दिवसांच्या कोठडीचा पुरेपूर वापर केला आहे आणि त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत आणखी दोन दिवसांची कोठडी शेष आहे आणि मानेच्या प्रकरणात आणखी 16 दिवसांची कोठडी शेष आहे.

“वाझे  आणि माने दोघेही (माजी) पोलीस अधिकारी असल्याने त्यांना तपास यंत्रणेला खोटे मार्ग दाखवून मुख्य चौकशी टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या डावपेचांची जाणीव होती. तथापि, एजन्सीकडे काही आक्षेपार्ह साहित्य आहे ज्याचा आता त्यांच्याशी सामना करणे आवश्यक आहे.” असा दावा NIA  ने केला .

Comments are closed.