Take a fresh look at your lifestyle.

नगरसेवक सचिन देशमुख यांचा काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा..

महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पध्दतीने सुरु असल्याचा केला आरोप

परभणी महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पध्दतीने सुरु असून जनतेच्या हिताला हरताळ फासला जात असल्याचा थेट आरोप करित नगरसेवक माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून याबाबत त्यांनीच मंगळवारी (दि.16) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या हितासाठी मांडलेल्या भूमिकेला पक्षाकडूनच विरोध होत असल्यानेच हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हनाले.

मागिल 10 वर्षापासुन नगरसेवक असलेले श्री. देशमुख यांनी सांगितले की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ नागरिकांच्या कामांसाठी सतत झटत असल्यामुळे नागरिकांनीच मला महापालिका स्थापन झाल्यनंतर २०१२ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी उभे केले व नरसेवक म्हणून निवडून दिले. फक्त सर्वसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेत असल्याने माझ्यावर हा विश्वास मतदारांनी टाकला. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून तेंव्हापासून मी कार्यरत आहे. दुसऱ्यांदा देखील तोच विश्वास मतदारांनी टाकून माझ्या कामाची पावती मला दिली. म्हणून मी नागरिकांच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले आहे व यापुढे देखील नागरिकांची सेवा करणे हेच माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ध्येय निश्चित केले आहे. परभणी महानगरपालिका झाली म्हणजे नागरिकांना त्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळायला हव्यात. मात्र महापालिका काय आणि नगरपालिका काय नागरी सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी करण्यासाठी मी २०१२ पासून नगरसेवक झालयनंतर प्रयत्न केले .

त्यात मला बऱ्यापैकी यश देखील मिळाले आहे. माझ्या प्रभागात मुलभूत नागरी सुविधा ज्यामध्ये रस्ते , नाल्या , पथदिवे , स्वच्छता , पिण्याचे पाणी आदी प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करुन ते सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यात बऱ्यापैकी मी यशस्वी झालो. नागरिकांना पाणी सुटण्याची वेळ माहित व्हावी मी एसएमएस सेवा सुरु केली. त्याचा सर्व नागरिकांना विशेषत : घरातील गृहिणींना मोठा फायदा झाला . प्रभागातील भुगर्भातील पाणीपातळी वाढावी यासाठी जलपुनर्भरण केले . नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बीपीएल कार्ड, आधारकार्ड , गॅस कनेक्शन आदींची उपलब्धता करून दिली. त्याचबरोबर लोडशेडींग मुक्त प्रभाग, कचरा कुंडीमुक्त प्रभाग , वृक्षलागवड या उपक्रमांबरोबर सार्वजनिक ध्वजारोहण आदी उपक्रम राबविले. महापालिकेच्या आरोग्य समिती सभापतीपदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर माझ्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या. जबाबदारी देखील वाढली. सभापती म्हणून काम करताना चार प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्ण केली. शहरासाठी आठ एमबीबीएस डॉक्टर्स नियुक्त केले. शहरासाठी मोठा औषधीसाठी उपलब्ध उपलब्ध करुन देण्यात मला यश आले. परभणी शहरासाठी ६० बेडच्या रुग्णालयाला मंजूरी आणण्यासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी झाले. कोविड काळात नागरिकांना रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळावे यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे मागणी करुन त्याचा पाठपुरावा केला व हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. कोरोना कळात नागरिकांना भाजीपाला मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला मार्केट उपलब्ध करुन दिले. महापालिकेकडून नागरिकांच्या मालमत्ताची कर आकारणी नव्याने करण्यात आली. त्यामध्ये ४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार लावण्यात आला होता. नागरिकांवर पडणारा हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले व हा ४४ कोटी रुपयाचा बोजा जनतेवर पडला नाही . दरवर्षी २२ कोटी रुपये नागरिकांचे वाचले दहा वर्षाचे परभणीकरांचे एकूण २२२ कोटी रुपये वाचविण्यास यश आले. परभणी शहरात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करताना नळजोडणीसाठी अवाजवी दर एजन्सीमार्फत लावण्यात येत होते. त्याला कडाडून विरोध केला व सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही ही लढाई लढली . त्यात पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे महापालिकेला नमते घ्यावे लागले व एजन्सी रद्द करण्यात आली . ५० हजार घरांचे १० हजार रुपयाप्रमाणे ५० कोटी परभणीकरांचे वाचविण्यात यश आले . तसेच १५ कोटी महापालिकेचा फायदा झाला आणि शहरात ३० कोटी रुपये खर्च होवून ५ हजार कुटूंबांना रोजगार देखील मिळाला. महापालिकेकडून ७२ लाख रुपयाचा लाईट बिलाचा घोटाळा उघडकीस आणला या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले.मात्र कारवाई काय झाली हे समजू शकले नाही .

एलबीटी वसूलीसाठी महापालिकेने नियुक्त केलेली एजन्सी ही फाईलवर नियुक्त न करता कमिशनवर केली होती त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्याचा त्रासही सहन करावा लागला . याबाबत आपण सभागृहात आवाज उठविला . परभणीच्या इतिहासात प्रथमच रात्री १ वाजेर्यंत सभागृहात हा विषय लावून धरला आणि ती एजन्सी रद्द करण्यात यश आले . परभणी शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांवरील आरक्षण उठविण्याचा प्रयत्न चालू असतानाच त्या प्रस्तावाला आपण प्रखर विरोध केला. हा विरोध मी एकट्यानेच केला . या जागा महापालिकेला आरोग्य केंद्र , अग्नीशामक विभाग , भविष्यात शहर परिवहन सेवा यासाठी उपयोगात आणता येणार आहेत . परभणी शहरातून निघणारा कचरा धार रोडवर टाकल्या जातो . त्या कचरा डेपोचा प्रश्न अद्यापही प्रलंबीत असून त्या बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतल्या जात नाह . मी याबाबत भूमिका घेतली असता त्याला मुद्दाम विरोध करण्यात आला . मी नेहमी नागरिकांच्या हितासाठी काम करत असून माझ्या या जनहितार्थ असलेली भूमिका राजकीय मंडळींना पसंत पडत नाही. त्यांच्या धोरणाला मी विरोध केल्यामुळेच अनेकांचे आर्थिक नुकसान झाले असावे किंवा त्यांच्या खऱ्या भूमिका लोकांसमोर आल्याने त्यांनी मला त्रास देणे सुरु केले आहे. ज्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मला सहकार्य करु नका असे सांगणे , मी दिलेले विषय महापालिकेच्या पटलावर न घेणे , माझी कामे अडवून ठेवणे असे प्रकार सातत्याने होत आहेत . परभणी महापालिकेत खरेतर विरोधी पक्षच नाहीत . सर्वजण सत्तेत सहभागी असल्याचे दिसते . फक्त मी जनतेच्या हितासाठी कामे करत असल्यामुळे मीच एकमेव विरोधी भूमिकेत आहे . त्यामुळे मला हे सत्ताधारी टार्गेट करु पाहत आहेत . महापालिकेतील सत्ताधारी हे कोणतेच नविन धोरण राबवित नाहीत . फक्त जुन्या योजनांवर काम सुरु आहे . त्या योजना देखील पूर्ण होत नाहीत . पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहे . डम्पींग ग्राउंड , उद्याने , रस्ते हे प्रश्न कायम आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजव्यासाठी पाच वर्षे उलटत आली तरी मुहूर्त मिळालेला नाही. शहराच्या उत्पन्न वाढीसाठी कोणतेही धोरण नाही, कर्जफेडीबाबतही कोणतीच भूमिका घेतल्या जात नाही. या विषयावर बोलले असता त्याकडे दुर्लक्ष केले जाते . परभणी महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पध्दतीने सुरु असून जनतेच्या हिताला हरताळ फासला जात आहे . माझ्या सदसदविवेक बुध्दीला हा सर्व प्रकार पटत नाही . अशा पध्दतीने काम केल्यास शहराचे व नागरिकांचे भले होणार नाही , उलट परभणी शहर कंगाल होईल . माझ्या सोबत जनतेचा स्वाभीमान जोडलेला असल्याने त्यांच्या सोबत अशा परिस्थितीत काम करणे शक्य नाही. मी नागरिकांच्या हितासाठी मांडलेल्या भूमिकेला माझ्या पक्षाकडूनच विरोध होत असेल तर त्या पक्षातून बाहेर पडून जनतेची घडेल अशी सेवा करण्याचा मी निर्णय घेतला आहे . आणि म्हणूनच मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे . मी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेवक म्हणून कायम जनतेच्या सेवेत तत्पर आहे. माझा राजीनामा ही माघार नसून जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने , नव्या उमेदीने कामाला लागणार आहे, असे नगरसेवक सचिन देशमुख म्हनाले.

Comments are closed.