सेलू : एसटीच्या संपाला आता आम्ही वैतागलो. एक महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप आम्हा प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारा व त्रासदायक असून आम्हाला आर्थिक भुर्दंड देणारा ठरला आहे. कारण खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत असून आम्हाला नाईलाजाने जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया सेलू तालुक्यातील सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी यांनी लोकपत्रशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता महिना उलटून गेला आहे. ऐन दिवाळी सनाच्या हंगामात सुरू झालेला संप नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसांत आटोपणार अशी सर्वसाधारण प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र तो चांगलाच चिघळला असून ना एसटी कर्मचारी माघार घेत आहेत ना शासन त्यांची मागणी पूर्ण करत आहे. यात होरपळला जात आहे तो सामान्य प्रवासी. आम्हाला शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊन कष्टाने शिक्षण पूर्ण करावे लागते. एसटीने प्रवास केल्यास पैसे वाचतात कारण आम्हाला एसटी सवलतीच्या दरात पास देते. मात्र खासगी वाहतूकदार अशी कोणतीही सवलत देत नाहीत. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास परवडत नसून आम्ही शाळा महाविद्यालयात जाऊन शिक्षण कसे घ्यायचे अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालकांनी दिल्या आहेत….
– डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.