Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, काल देशभरात सापडले तब्बल ‘एवढे’ नवे रुग्ण

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे अनेक राज्यांनी चालू कोविड निर्बंधात शिथिलता दिली, पण  काही दिवसांपासून कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करत असून, मास्क शिवाय फिरताना दिसत आहे. परिणामी कोरोनाची कमी होणारी रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने  दिली माहिती 

देशात कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा भीती वाटू लागली आहे. देशात कोरोनाचा आलेख ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता तिसऱ्या लाटेचा इशारा योग्य असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 42 हजार 618 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर या कालावधीत 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोना रूग्ण मिळाल्यानंतर, देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 3 कोटी 29 लाख 45 हजार 907 वर गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे सध्या 4 लाख 5 हजार 681 सक्रिय प्रकरण आहेत, तर 3 कोटी 21 लाख 1 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 40 हजार 225 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 67,72,11,205 लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 58,85,687 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 4,313 नवीन रुग्ण , 92 मृत्यू 
शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 4,313 नवे रुग्ण आढळले आणि 92 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला.  राज्यातील एकूण प्रकरणे 64,77,987 वर गेली आहेत आणि मृतांची संख्या 1,37,643 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की आज पुणे विभागात सर्वात जास्त 35 मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना  संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 62,86,345 वर गेली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 50,466 आहे.

कर्नाटकात कोरोनाची 1,240 नवीन प्रकरणे समोर आली आहेत
गुरुवारी, कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,240 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर एकूण प्रकरणे 29.52 लाखांवर गेली. काल कर्नाटक राज्यात 22 रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या 37,361 वर गेली. आरोग्य विभागाच्या मते, सध्या राज्यात 18,378 रुग्ण उपचार घेत आहेत.

केरळची स्थिती अतिशय बिकट 

सध्या देशातील कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित राज्य केरळ असून, देशभरात सापडणाऱ्या एकूण नवीन कोरोना रुग्णांपैकी दोन त्रितीयांश प्रकरणे केरळ मधून येत आहेत. सध्या केरळ मध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आगमनाचा धोका आता अतिशय गंभीर होत असून, तिसरी लाट  जास्त पसरू नये यासाठी सर्वानी कोरोना प्रोटोकॉल पाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच ज्यांनी अद्यापही लास घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लास घेण्याचे आवाहन सरकार करत आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका