Take a fresh look at your lifestyle.

सैराटची आर्ची….रिंकू राजगुरू या अभिनेत्याला करतेय डेट…. जाणून घ्या कोण आहे हा प्रसिद्ध अभिनेता…

मित्रहो मध्यंतरी सर्वत्र गाजलेला चित्रपट “सैराट” आजही प्रचंड चर्चेत असतो. या चित्रपटाने एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली असून, यातील प्रत्येक गोष्ट विशेष गाजली आहे. शिवाय यातील गाव आणि इथली भाषा सुद्धा भलतीच लोकप्रिय झाली आहे. तसेच सर्वात जास्त यातील मुख्य भूमिकेत झळकलेले कलाकार आर्ची आणि परशा सुद्धा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. या दोघांची जोडी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. तसेच यातील सर्व गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

यामध्ये बुलेट वरून गाव हिंडणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू प्रथमच पडद्यावर आली आणि गाजली सुद्धा. तसेच तिच्या जोडीला असलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर देखील प्रथमच पडद्यावर झळकला होता. त्याला सुद्धा या चित्रपटातून अभिनयाची संधी मिळून त्याचे करियर प्रसिद्धीच्या मोठ्या टप्प्यावर येऊन उभे आहे. रिंकू आणि आकाश या दोघांनाही अनेक जण पसंत करतात. त्यांची जोडी सोशल मीडियावर देखील खुप लाईक केली जाते.

रिंकू चित्रपटानंतर पुन्हा अनेक चित्रपटात दिसली आहे, तसेच काही वेबसिरीज मध्ये सुद्धा दिसली आहे. आकाशला देखील अनेक चित्रपटात पाहण्यात आले आहे. मात्र आता सोशल मीडियावर ही जोड पुन्हा एकदा एकत्र दिसत असून प्रेक्षकांना चर्चेत गुंतवत आहे. त्यांचे खूपसे छान छान एकत्र काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये ते खूपच सुंदर दिसत आहेत, अभिनेत्री रिंकू आता अभिनेता आकाश ठोसर याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.

ते दोघेही एका खास डिनर डेटला गेले असल्याची माहिती मिळाली आहे, त्यांचा खास डिनर डेट विशेष चर्चेत आला आहे. त्या दोघांमध्ये आधीपासूनच खूप घट्ट मैत्री होती, तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली आहे. मात्र त्यांच्या फोटोतून अनेकांना प्रश्न पडला आहे की यांच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत..? सोशल मीडियावर यांसारख्या अनेक बातम्या चर्चेला उधाण आणत आहेत.

रिंकू आणि आकाश यांनी आपल्या डिनर डेट चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, एवढेच नव्हे तर डेट नंतर रिंकू घरी जाताना सुद्धा आकाशने तिचा एक व्हिडिओ शूट केला आहे आणि लवकरच भेटू अस लिहलं आहे. हा व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल झाला असून त्यांच्या जोडीला आणखीन लाईक्स मिळत आहेत. तुम्हाला यावर काय वाटते ते कमेन्ट करून सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Comments are closed.