Take a fresh look at your lifestyle.

‘ठाकूर’ असे बनले ‘देव’…शाहूमहाराज म्हणाले आजपासून तुम्ही “देव”..आणि रमेश देवांच बदललं आडनाव .

मित्रहो कलाक्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत, चित्रपटाव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्याने सुद्धा अनेकांना विशेष प्रेरित केले आहे. कलेच्या उत्कृष्ट वारसदारामध्ये गणले जाणारे अभिनेते रमेश देव नुकतेच आपणाला या सृष्टीत एकटे सोडून गेले आहेत, त्यांची मावळलेली प्राणज्योत अनेकांना भावुक करत आहे. अगदी ३ दिवसांपूर्वी त्यांनी आपला जन्मदिवस साजरा केला होता. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

जवळपास ९३ वर्षाचे असलेले रमेश सर्वत्र विशेष लोकप्रिय होते, त्यांनी १९५० मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अमरावती जिल्ह्यात जन्मलेले हे अभिनेते स्वबळावर यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिकांतून, मराठी व हिंदी चित्रपटातून रसिकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अभिनयाचा इतिहास घडवणारे रमेश देव यांचाही एक इतिहास आहे.

रमेश देव यांचे घराणे राजस्थान मधील होते, त्यांच्या पूर्वजांनी जोधपूर मधून कोल्हापुरात आपले स्थान वसवले होते. रमेश यांचे आजोबा व पणजोबा हे पेशाने इंजिनिअर होते. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर शहर वसवण्यासाठी खास बोलावलं होतं. त्यांच्या आकलन क्षमतेवर महाराजांचा पूर्ण विश्वास होता आणि त्यापद्धतीने त्यांनी खूप छान आराखडा तयार केला आहे.

रमेश देव यांचे वडील हे शाहू महाराजांच्या दरबारात फौजदारी वकील होते. ते नेहमीच शाहू महाराजांसमवेत असायचे आणि याच दरम्यान एके दिवशी त्यांनी महाराजांना अशी काही मदत केली की ते महाराजांसाठी खूप मोलाचे ठरले होते. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले होते की “ठाकूर तुम्ही देवासारखे भेटलात बघा….तुम्ही आता ठाकूर नाही तर तुम्ही आजपासून “देवच” “. महाराजांचे हे शब्द कानावर पडताच फौजदार खूप आनंदी झाले.

रमेश देव यांचे वडील महाराजांचा खूप आदर करत असत, ते नेहमी त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत होते आणि म्हणून तर “ठाकूर नसून तुम्ही देव” अस म्हणताच रमेश यांच्या वडिलांनी आपले आडनाव बदलून “देव” ठेवले. त्यादिवसापासून ठाकूर कुटुंबीय देव बनले. या देव कुटुंबाने नेहमीच आपली कर्तबगारी सादर केली आहे, आणि हेच गुण रमेश यांच्यातही होते. रमेश देव हे जरी आता आपल्यात नसले तरीही ते नेहमीच आपल्या अभिनयातून, भूमिकांतून सोबत राहतील. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेंच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Comments are closed.