Take a fresh look at your lifestyle.

माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का ! कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत अखेर राष्ट्रवादी..

नगर : माजी मंत्री राम शिंदेचे समर्थक व भाजपातील ज्येष्ट नेते नामदेव राऊत यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांगीण विकासासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून दोन वर्षांत निधी कमी पडू दिला नाही. नामदेव राऊत आणि सहकाऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्जत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना ताबडतोब पूर्ण करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत यांच्या प्रवेशानंतर अश्वासन दिले.

कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी चार नगरसेवक आणि पदाधिकारी- कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके व लालासाहेब शेळके, प्रसाद ढोकरीकर, उद्योजक दीपक शिंदे, रवी पाटील, नितीन तोरडमल, भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी उपस्थित होते.

नामदेव राऊत म्हणाले, की मिळालेल्या संधीचे सोने करीत शहराचा विकास साधला. आता शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वप्नातील कर्जतची उभारणी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकामी मार्गदर्शन मिळणार आहे.

राऊत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हर्षदा काळदाते, नगरसेविका उषा राऊत, नगरसेविका वृषाली पाटील यांचे पती प्रा. किरण पाटील, नगरसेवक सुधाकर समुद्र यांचे चिरंजीव सतीश समुद्र, अमृत काळदाते, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, बाजार समितीचे संचालक बजरंग कदम, सरपंच दीपक ननावरे, मंगेश नेवसे, महादेव खंदारे, उमेश जपे, इन्नूस पठाण, धनंजय थोरात, भाऊसाहेब पोटरे, मनोज आल्हाट, बबलू साकरे, अभिजित गिरी, कैलास बनकर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Comments are closed.