Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी: ED ने DRUGS प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह ‘या’ मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले

नवी दिल्ली: ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड आणि टॉलीवुड कलाकारांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून, आता 4 वर्ष जुन्या प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती आणि अन्य 10 मोठ्या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रकुल 6 सप्टेंबरला ईडीसमोर हजर होणार असून, राणा दग्गुबतीची 8 सप्टेंबरला चौकशी केली जाईल.

TOI  मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात ईडीने अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशी साठी बोलावले आहे. रकुल प्रीत सिंग आणि राणा दग्गुबती सारख्या बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त, रवी तेजा, चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सारख्या टॉलीवुड सेलिब्रिटींनाही ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले.

सर्व सेलेब्सना 2 ते 22 सप्टेंबर दरम्यान तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल. रवी तेजा यांना 9 सप्टेंबरला एजन्सीसमोर आणि 15 नोव्हेंबर रोजी मुमैथ खान यांना हजर राहण्यास सांगितले आहे. पुराव्यांच्या अभावामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलाकारांवर कारवाई केली नाही आणि आरोपपत्र दाखल केले नाही.

टाइम्स इंडिया मध्ये प्रकाशित बातमीनुसार, या सर्व सेलेब्सना पुढील महिन्यातील 2 ते 22 तारखे दरम्यान तपास यंत्रणेसमोर हजर रहावे लागेल. रवी तेजा यांना 9 सप्टेंबरला आणि 15 नोव्हेंबर रोजी मुमैथ खान यांना हजर राहण्यास सांगितले . हे चार वर्षापूर्वीचे प्रकरण आहे. ठोस पुराव्यांच्या अभावामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या (SIT) विशेष तपास पथकाने अद्याप कलाकारांवर कारवाई केली नाही आणि कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही.

एसआयटीने जेव्हा या कलाकारांची चौकशी केली, तेव्हा त्या कलाकारांनी अशा कोणत्याही प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले. या प्रकरणाविषयी बोलताना  ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगीतले की, “तेलंगणा उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने सुमारे 12 गुन्हे नोंदवले होते, तसेच 11 आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले, यात  मुख्यतः ड्रग्स तस्कर होते. आम्ही उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे. जोपर्यंत आम्हाला पुरावा मिळत नाही, तोपर्यंत टॉलीवुड सेलेब्स साक्षीदार मानले जातील. ज्यांची नावे तपासात पुढे आली आहेत.”

Comments are closed.