Take a fresh look at your lifestyle.

रक्षाबंधनाशी संबंधित या पौराणिक कथांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ऐकून विश्वास बसणार नाही

रक्षाबंधन: भावा बहिणीच्या पवित्र नात्यासाठी सर्वात महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला फार महत्व आहे. या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन बहिणीला देतो. पण इतिहासात बर्‍याच वेळा हा सण फक्त भावा-बहिणीपुरता मर्यादित राहिला नाही. अनेक वेळा पतीच्या रक्षणसाठी पत्नीने राखी बांधली असल्याची माहिती आहे. आज या लेखात आपण रक्षाबंधनाशी संबंधित काही रंजक पौराणिक आणि ऐतिहासिक कथाविषयी जाणून घेऊया…

रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो?

जेव्हापण हा प्रश्न डोक्यात येतो तेव्हा सर्वात आधी श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचे नाते डोळ्यासमोर येते. महाभारतात जेव्हा कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा डाव रचला होता त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वाचवले होते. तेव्हा पासून रक्षाबंधन सण साजरा केला जातो असे म्हणतात.

रानी कर्णवती  आणि हुमायूँ  यांची कथा

बहुतांश लोकांना माहित आहे की जेव्हा चित्तूरचे शासक महाराणा विक्रमादित्यच्या राज्यावर गुजरातच्या सुलतान बहादुर शाहने हल्ला केला होता. तेव्हा महाराणा विक्रमादित्य यांची पत्नी राणी कर्णावती हिने सेठ पद्मशहाच्या हस्ते हुमायूनकडे राखी पाठवून मदत मागितली होती. परंतु ही रक्षा बंधन साजरा करण्याशी संबंधित एकमेव कथा नाही. इतर अनेक पौराणिक कथा आहेत, ज्यात रक्षाबंधन का साजरा केला जातो याची माहिती मिळते.

शचीने इंद्रदेवला राखी बांधली होती

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, देवराज इंद्राची पत्नी शची हिने स्वतःच्या पतीलाच संरक्षणासाठी राखी बांधली होती. असे म्हटले जाते की वृत्रासूर नावाच्या राक्षसाने देवराज इंद्राशी युद्ध केले होते. मग वृत्रासुरापासून तिच्या पतीचे रक्षण करण्यासाठी, इंद्राणी शचीने तिच्या दृढतेने एक रक्षासूत्र तयार केले होते. ते रक्षसूत्र शचिने श्रावण पौर्णिमेच्या दिवशी इंद्राच्या मनगटावर बांधले होते. या रक्षासूत्राने इंद्राचे रक्षण केले आणि विजय मिळवून दिला.

सिकंदरच्या पत्नीने राजा पुरूला पाठवली होती राखी

असे म्हटले जाते की जेव्हा अलेक्झांडर संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघाला होता, तेव्हा तो भारतात आला होता.  त्यावेळी त्याची राजा पुरूशी सामना झाला होता.  युद्धात राजा पुरूने सिकंदरला पराभूत केले होते. पण तिच्या पतीला हारताना पाहून सिकंदरच्या पत्नीने राजा पुरूकडे आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी राखी पाठवली होती. त्यानंतर युद्धाच्या वेळी पुरूचे हात अलेक्झांडरवर उठले नाहीत. त्यामुळे सिकंदरने पुरुला कैदी बनवले होते. परंतु नंतर पत्नीच्या राखीच्या सन्मानची काळजी करत सिकंदरने पुरुला सोडले व त्याचे राज्य परत केले.

नोट: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या गोष्टींची पुष्टी करत नाही. हे लागू करण्यापूर्वी, कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.

Comments are closed.