Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज व उद्या परभणी जिल्हा दौर्‍यावर

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे गुरुवारी (दि.23) सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍यात विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी नांदेड येथून सायंकाळी 6.50 वाजता त्यांचे परभणी येथे आगमन होईल. सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान रा.काँ.पा. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी शहर जिल्हा कार्यकारिणी बैठकीस श्री टोपे यांची उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते मुक्कामी थांबतील. शुक्रवारी (दि.24) सकाळी 10.30 वाजता ते 11.45 वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास आरोग्यमंत्री टोपे हे भेट देणार आहेत. सकाळी 11.45 ते 12.30 वाजता रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बैठकीस त्यांची उपस्थिती राहील.

दुपारी 1 वाजता ते परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण करतील. जिंतूर येथे पदाधिकार्‍यांच्या भेटी घेवून संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता जिंतूर येथून ते पाथरीकडे प्रयाण करतील. पाथरी येथे दुपारी 4.30 ते 5.15 वाजेदरम्यान जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5.15 वाजता पाथरी येथून परतूरकडे ते प्रयाण करतील.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका