Take a fresh look at your lifestyle.

सत्ता काबीज करण्यासाठी प्रभाग रचनेत बदल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका

सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचनेत बदल केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुरुवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.

दरम्यान सत्ता काबीज करण्यासाठी प्रभाग रचनेचा सत्ताधाऱ्यांनी घाट घातला आहे. लोक जनतेला गृहीत धरतात. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. हा नुसता खेळ सुरू आहे. फक्त पालिका याच स्थानिक स्वराज्य संस्थेलाच प्रभाग पद्धत का ? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, लोकांनी कोर्टात चॅलेंज करायला हवे, तर संघटनात्मक नेमणूक करण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवारी) नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, विनापरवानगी लावण्यात आलेली राजकीय होर्डिंग्ज हटविण्यात आली. अशी कोणी राजकीय होर्डिंग्ज यापुढे लावली तर कारवाई होणारच, अशा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. दरम्यान, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

Comments are closed.