Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतला समाचार, म्हणाले राज ठाकरे अज्ञानी…

मुंबई: जातिवाद या विषयावर बोलत असताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीय अस्मितेच्या मुद्दयाने डोके वर काढले, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नाराज झाले असून त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी हा शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष

राज ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे, ते म्हणाले, “राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यांच्या वैचारिक धोरणांना धरून आम्ही राजकारण करतो. बहुतेक राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहिती नसेल म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत.”

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखाती दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले. हिंदुत्वाच्या राजकारणाला मागे टाकण्यासाठीच राज्यात जातीचे राजकारण सुरू करण्यात आलं का ? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षावर जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा केल्याचा आरोप केला.

जाती व्यवस्था हजारो वर्षापासून

देशात जातिवाद हजारो वर्षापासून आहे. या देशात मुनुवादी व्यवस्थेमुळेच वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जाती जन्मल्या. त्या जातींच्या आधारावर अनेक जातीवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना माहीत नसावं, असा उपरोधक टोमणा नवाब मलिक यांनी मारला.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समतेवर आधारित समाज बनवण्याचा त्यांनी काम केलं हे सुद्धा राज ठाकरेंना माहीत नसावं अशी टीका करतानाच राज ठाकरे यांनी त्यांच्या अज्ञानातून ते वक्तव्य केलं असावं असा टोमणा मारला.

Comments are closed.