Take a fresh look at your lifestyle.

आमदार समर्थकांवर ॲट्रॉसिटी पारनेर मध्ये पुन्हा राजकारण तापले.

नगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी वर आरोप करत आत्महत्या करणार असल्याचे सांगणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पारनेर तालुक्यात सुरू झालेली राजकीय कुरघोडीत थांबायला तयार नाही आमदार निलेश यांचे खंदे समर्थक आणि जवळचे कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्यावर आज अॅट्रासिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. हलकट झावरे यांनी ही हा गुन्हा राजकीय प्रेरित गुन्हा असल्याचा आरोप केला असल्यामुळे पारनेर तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे दिसत आहे.

साधारण महिन्याभरापूर्वी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्रास देत असल्यामुळे आपण व्यथित झालो असून काम करणे अवघड झाले आहे, असा आरोप करत आत्महत्या करणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. देवरे त्यांचा सर्व रोख हा आमदार निलेश लंके यांच्याकडे होता हे त्याच वेळी स्पष्ट झाले. त्यानंतर भाजपने ज्योती देवरे यांची बाजू घेत लंकेवर आरोप केले. तसेच देवरे यांच्या विरोधात स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पारनेर तालुका हा सातत्याने ढवळून निघत होता.

पारनेर तालुक्यातील या आरोपप्रत्यारोप आनंतर आज वनकुटे तालुका पारनेर येथील सरपंच अॅड. राहुल झावरे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगत एका व्यक्तीने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तर हा माझ्यावर राजकीय प्रेरित होऊन गुन्हा केलेला असून त्यांनी काही लोकांची नावे घेत झावरे यानी हा गुन्हा दाखल करायला लावला असल्याचा पलटवार केला आहे. अडवोकेट राहुल झावरे हे आमदार निलेश लंके यांचे अत्यंत जवळच्या विश्वासू सहकारी मानले जातात त्यांची नुकतीच कृषी विभागाच्या आत्मा समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे.

Comments are closed.