Take a fresh look at your lifestyle.

परभणीसाठी नवीन एमआयडीसी मंजूर : आ.डॉ.राहूल पाटील पाच हजार युवकांना मिळणार रोजगार

परभणी तालुक्यातील बाभळगाव येथे नवीन एमआयडीसी स्थापनेकरीता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मंजूरी मिळाली असून भूसंपादन प्रक्रियेची नोटीस शासनातर्फे जारी करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात या नवीन एमआयडीसीची सुरूवात होणार असल्याची माहिती आ.डॉ. राहूल पाटील यांनी दिली आहे़ याबाबत अधिक माहिती देताना आ. डॉ.पाटील यांनी सांगितले की, या संदर्भात मुंबई येथे उद्योग मंत्रालयात मंगळवार, दि़२१ रोजी बैठक पार पडली़ यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ़.डॉ. राहूल पाटील यांच्यासह उद्योग मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाº

यांची उपस्थिती होती़ यावेळी आ.डॉ.पाटील म्हणाले, परभणी शहरात १९७४ साली महाराष्ट्र औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी १०० हेक्टर जागा होती़ सद्यस्थितीत या ठिकाणच्या संपूर्ण जागेवर उद्योग स्थापन करण्यात आल्यामुळे नवीन उद्योगासाठी जागा उपलब्ध नाही़ तालुक्यातील अनेक तरूण उद्योजक कृषी आधारीत व अन्य उद्योग करण्यासाठी ईच्छूक आहेत, परंतू जमिनी अभावी त्यांना उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत़ त्यामुळे तालुक्यातील बाभळगाव येथे नवीन एमआयडीसी स्थापनेला मंजुरी देण्यात यावी असा प्रस्ताव आ.डॉ.पाटील यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे सादर केला़

तसेच बाभळगाव येथील शेतकरी देखील नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले़ त्यानंतर उद्योगमंत्री देसाई यांनी आ.डॉ.पाटील यांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देत बाभळगाव येथील नवीन औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असणारी भूसंपादन ६ची नोटीस जारी करण्यात आली असल्याचे आ़डॉ़राहूल पाटील यांनी सांगितले़ नवीन एमआयडीसीमुळे लॉकडाऊन नंतर अडचणीत आलेल्या उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे़ तसेच शेत, फळ, सोयाबिनसह अन्य उद्योग स्थापन होणार असल्याने जिल्ह्यातील ५ हजार युवकांना रोजगार मिळणार आहे़ यामुळे परभणी जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती बदलणार असून उद्योजगांसह युवकांच्या विकासाला चालना मिळणार आ़डॉ़पाटील यांनी सांगितले़

Comments are closed.