Take a fresh look at your lifestyle.

“पुष्पा..” साठी पहिली पसंती महेश बाबूला दिली मात्र या कारणास्तव त्याने दिला नकार…..आणि मग अल्लू अर्जुन ….!

मित्रहो नशीब जे करायला लावते आपणाला तेच करावे लागते. कधी कधी संधी आपले दार खूप ठोठावते मात्र आपण तेव्हा निजलेल्या अवस्थेत असतो, आणि आपण तिला सहज फेटाळून लावंतो. असेच काहीसे दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याच्या बाबतीत घडले असून, त्याने आपणाला मिळालेली संधी नाकारली होती. याआधी देखील आमिर खानचा गाजलेला चित्रपट “लगान” यासाठी अभिनेता अभिषेक बच्चन याला निवडले होते मात्र त्याने जवळपास सहा वेळा नकार दिला, आणि ती भूमिका मग आमिरला मिळाली.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर प्रसिद्धी मिळवली होती. आता तशीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी अल्लू अर्जुनच्या “पुष्पा” चित्रपटाने मिळवली आहे. या चित्रपटात आता आपणाला अल्लू अर्जुनच्या ठिकाणी अन्य कोणत्याही अभिनेत्याची कल्पना करावीशी वाटत नाही कारण त्यानेच ती भूमिका उत्कृष्ट रीतीने निभावली आहे. ती भूमिका आणि तो अभिनय त्याला उत्तम जमला आहे. मात्र या भूमिकेसाठी दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू यांना पाहिले तर ते देखील या भूमिकेसाठी उत्तम असावे.

त्यांना पुष्पाचे कथानक खूप आवडले होते, हैदराबाद मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक सुकुमार हे महेश बाबूला कास्ट करण्यास उत्सुक होते. त्यांनी खूपदा महेश यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला मात्र महेश हे आपल्या करिअर मध्ये समाजविरोधी भूमिका न करण्याचे वचन घेतले आहे. म्हणून त्यांनी या चित्रपटाला नकार दिला होता. मात्र त्यांना याचे कथानक खूप जास्त आवडले होते.

महेश यांना आपण या भूमिकेसाठी योग्य नाही असे तेव्हा वाटले होते. कारण समाज विघातक भूमिका साकारण्यावर त्यांचा विश्वास नाही. असे ते सुत्रांद्वारे सांगत आहेत. मात्र या भूमिकेत महेश सुद्धा उत्तम ठरले असते असे अनेकजणांना वाटते. सोशल मीडियावर या गोष्टीवरून खूप जास्त चर्चा सुरू आहे. या भूमिकेत अल्लू अर्जुन सुद्धा अगदी योग्य आहे, त्याने अप्रतिम अभिनय केला असून ही भूमिका खूप सुरेख साकारली आहे.

लोक हा चित्रपट खूप आवडीने पाहत आहेत, शिवाय यावर अनेकजण वेगवेगळ्या कमेन्ट करत आहेत. तर मित्रहो तुमची या चित्रपटावर आणि आजच्या आमच्या लेखावर काय कमेंट आहे ते नक्की सांगा तसेच जर हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका.

Comments are closed.