मित्रहो नुकताच पडद्यावर आलेला पुष्पा भलताच चर्चेत येत आहे. या चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय यातील प्रत्येक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. तसेंच पुष्पाच्या डबिंड साठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने आपला आवाज देऊन ही भूमिका आणखीन खुलवली आहे. या भूमिकेचे चाहते बघता बघता मोठ्या संख्येने वाढत आहेत. शिवाय या भूमिकेसह इतर भूमिका सुद्धा उत्तम साकारल्या आहेत, याना देखील उत्कृष्ट रित्या डबिंड करण्यात आले आहे.
म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीस पात्र ठरला आहे, मित्रहो यामध्ये अल्लू अर्जुन सह खूपसे अन्य कलाकार सुद्धा आहेत. यामध्ये रश्मीका मंदाना हीने श्रीवल्लीची भूमिका पार पाडली आहे, मात्र हिंदी डबिंड मध्ये या भूमिकेला सुप्रसिद्ध गायिका स्मिता मल्होत्रा हीने आवाज दिला आहे. तिचा आवाज अगदी हुबेहूब त्या भूमिकेला सजवतो. स्मिता एक डबिंड आर्टिस्ट आहे, तिने याआधी सुद्धा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांचे डबिंड केले आहे.
पुष्पराज आणि श्रीवल्ली हे दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत, मात्र त्यांच्या भूमिकांना आणखीन खेळवणाऱ्या भूमिका आहेत त्यापैकी एक म्हणजे पुष्पाचा मित्र. त्याच्या भूमिकेला अभिनेता साहिल वैद्य याने आवाज दिला आहे. ही भूमिका देखील खूप मजेशीर वाटते, साहिल हा सध्या बॉलिवूड मध्ये स्वतःची ओळख मिळवण्यावत व्यस्त आहे. तो शेरशाह चित्रपटात मुख्य नायकाच्या मित्राच्या भूमिकेत झळकला होता.
तसेच पुष्पा मध्ये आणखीन एक पात्र भाव खाऊन जाते, ते म्हणजे मंगल श्रीनूचे…..या भूमिकेला दाक्षिणात्य अभिनेता सुनील यांने साकारले आहे. ही भूमिका सुद्धा पाहताना अगदी अंगावर शहारे आणणारी आहे. श्रीनूच्या या विरोधी भूमिकेला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेता उदय सबनीस यांनी आवाज दिला आहे. उदय हे एक मराठी कलाकार आणि डबिंड आर्टिस्ट म्हणून सर्वत्र ओळखले जातात. तसेच त्यांनी फक्त या चित्रपटातच श्रीनूच्या भूमिकेला आवाज दिला नसून अनेक प्रसिद्ध कार्टून्सना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अल्लू अर्जुन याच्या भूमिकेसाठी संकेतचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र तिथे श्रेयसचा नंबर लागला, पण अनेकांना वाटत होते की श्रेयसचा आवाज अल्लू अर्जुनला शोभणार नाही. मात्र जेव्हा प्रत्यक्षात तो पिक्चर पाहिला लोकांनी तेव्हा स्वतःच श्रेयसचे कौतुक करू लागले. तसेच यातील सर्व डबिंड आर्टिस्टनी उत्तम रित्या आवाज डब केला आहे, त्यामुळे मराठी, हिंदी प्रेक्षकांना हा चित्रपट मनापासून पाहता आला. त्याबद्दल या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार. तसेच आमचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.
Comments are closed.