Take a fresh look at your lifestyle.

गुरूवारी प्रा.जयदेव डोळे यांचे व्याख्यान’अक्षर व्याख्यानमाला’ सेलूतील शिक्षकांचा उपक्रम

सेलू (डाॅ विलास मोरे) :- येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या पुढाकारातून शहरातील शिक्षकांनी या वर्षी पासून ‘अक्षर व्याख्यानमाला’ हा प्रबोधन जागर उपक्रम सुरू केला आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध विचारवंत प्रा. जयदेव डोळे ( औरंगाबाद ) यांचे ‘ समृद्ध जीवनासाठी वाचन ‘ या विषयावर शहरातील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात गुरुवार ( दि.२१ ) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे असणार आहेत. अक्षर व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमास कोव्हिड – १९ चे सर्व शासकीय नियम पाळून उपस्थित राहावे. असे आवाहन मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, सुरेश हिवाळे , सुभाष मोहकरे, नरेश पाटील, नानासाहेब पवार, शेख मौजम, रमेश नखाते, शरद ठाकर, किशन कटारे, किशोर कटारे, बाळू बुधवंत, माणिक सुरवसे, भगवान पल्लेवाड, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, एकनाथ जाधव, दत्तात्रेय रोकडे, दिगंबर रोकडे व संयोजक शिक्षकांनी केले आहे.

Comments are closed.