Take a fresh look at your lifestyle.

प्राजक्त तनपुरेची ताकद वाढली, प्रकाश पोटे राष्ट्रवादीत…

नगर : जनआधार संघटनेचे संस्थापक व अहमदनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी आज दि. 16 रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पोटे यांच्या प्रवेशाने मंत्री प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढली आहे.

अहमदनगर तालुक्यात सलग पंचवीस वर्ष माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले प्रतिनिधित्व करत होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला. तनपुरे सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत आहे. राज्यमंत्री म्हणून काम करत असतानाही त्यांनी मतदारसंघावरील पकड कमी होऊ दिले नाही. उलट ते पक्षाचे फळी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर तालुक्यातील गावे ही राहुरी- नगर, श्रीगोंदा तसेच पारनेर मतदार संघात विभागली गेली आहे. यामुळे या तीनही मतदार संघातील नेत्याचे नगर तालुक्यावर असते. सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांना कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री नामदार मा. प्राजक्त दादा तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष,मा.घनश्याम आण्णा शेलार,माजी आमदार राहुल दादा जगताप, अण्णा शेलार, रोहिदास कर्डिले, शरद दादा पवार , अमित गांधी,. दीपक गुगळे,शह नवाज शेख, मा.गणेश निमसे, निखिल शेलार, सुशील कदम,आदी उपस्थित होते..

Comments are closed.