Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान ! नुकसान भरपाई देण्याची मागणी ,प्रशासकीय यंत्रणा मात्र कुचकामी

सेलू (डाॅ विलास मोरे) :- तालुक्यात गेल्या दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी तर अतिवृष्टी झाल्याने शेतातील खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात मागिल काही दिवसांपासून मोठा खंड पडला होता. मात्र गणपती आगमन व महालक्ष्मी सणा दिवशी तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अक्षरशः ढगफुटी सद्रष्य पाऊस झाल्याने ओढे नाले मर्यादा सोडून वाहात होते. तर शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसुन आले. यात सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून जमिनी खरडल्या आहेत.

सेलू शहरातही अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. फळबागाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन पिकात तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. बाधितपिकाचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे..

Photo

Comments are closed.