Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: काबुल विमानतळावर तहान-भुकेने तडफत आहेत लोक, एक लिटर पाणी मिळतेय तब्बल 3,000 रुपयाला

काबुल: तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून या देशात सर्व काही बदलले आहे. अधिकाधिक लोकांना काहीही करून हा देश सोडायचा आहे. अफगाणिस्तान मधून बाहेर जाण्यासाठीसाठी सध्या एकच मार्ग शिल्लक आहे – ते म्हणजे काबूल विमानतळ. येथील सुरक्षा अमेरिकन सैनिकांकडे आहे. सध्या काबूल विमानतळावर सुमारे अडीच लाख अफगाणी नागरिकांची गर्दी आहे, ज्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे की, इथे लोकांना खाण्या-पिण्या साठी संघर्ष करावा लागत आहे. हजारो लोक भुकेने आणि तहानेने तडफत आहेत. अनेक लोकांचा भुखेने बळी गेला आहे.

7000 रुपयाला एक प्लेट भात मिळतोय

दरम्यान, काबुल विमानतळावर अन्न आणि पाण्याचे भाव गगनाला भिडत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. येथे पाण्याची बाटली $ 40 म्हणजे जवळपास 3000 रुपयांना उपलब्ध आहे. तर भाताच्या प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजेच 7500 रुपये खर्च करावे लागत आहेत. विमानतळावर पाणी किंवा अन्न खरेदी करायचे असो, येथे अफगाण चलन घेतले जात नाही. विशेष म्हणजे यासाठी फक्त अमेरिकन डॉलर स्वीकारले जात आहेत. त्यामुळे अफगाणी नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पना तुम्ही करू शकता.

घरून विमानतळावर पोहोचण्यासाठी 5 ते 6 दिवस लागत आहेत

अफगाणिस्तानमधील लोकांचे म्हणणे आहे की त्यांना काबूलमधील घरातून विमानतळावर पोहोचण्यास तब्बल 5 ते 6 दिवस लागले, कारण तालिबानचा शहरापासून विमानतळापर्यंत पहारा आहे. तालिबानच्या गोळीबारामुळे दहशत निर्माण झाली आहे आणि हजारो तालिबान्यांचा जमाव ओलांडून विमानतळावर प्रवेश करणे फार कठीण काम आहे. तुम्ही विमानतळाच्या आत गेलात तरी विमान येण्यास पाच ते सहा दिवस लागतात. फक्त बिस्किट खाऊन वर टिकून राहावे लागत आहे. खाण्यापिण्याच्या किंमती खूप जास्त असल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. अफगाणिस्तानची स्थिती अशी आहे की अनेक लहान मुलांना त्यांच्या पालकांशिवाय अफगाणिस्तान सोडावा लागत आहे.

आतापर्यंत 20 जणांचा झाला मृत्यू

अन्न आणि पाण्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे लोकांना उपाशी पोटी उन्हात उभे राहावे लागत आहे. त्यांची सहनशक्ती आता कमी होत असून शरीर अशक्त होत आहे. परिणामी ते बेशुद्ध पडत आहेत. अशा परिस्थितीत, लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे. मारत आहे. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आतापर्यंत 20 जण ठार झाले आहेत.

अफगाणी नागरिकांची परिस्थिती पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत. परंतु, तालिबानी लोक त्यांच्या पर्यंत मदत पोहोचू देत नसल्यामुळे मदत करू इच्छित देशही हवालदिल झाले आहेत.

Comments are closed.