आ.बाबाजानी यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; व्यापारी महासंघाचे निवेदन
जिल्ह्यातील पाथरी येथे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.21) शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आरोपी मोहम्मद बीन सईद बीन किलेद व त्याच्या पूत्राविरुध्द पोलिस प्रशासनाने तात्काळ एमपीडीए कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.
व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.22) सकाळी पोलिस व महसूल प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले. त्यात मोहम्मद बीन किलेद यांनी यापूर्वी केलेले गंभीर गुन्हे तसेच त्याच्या विरोधात आताही पाथरी पोलिस ठाण्यातील येत असलेल्या लेखी तक्रारींची दखल घ्यावी, असे नमूद आहे. संबंधित आरोपी गोरगरिबांसोबत गुंडगिरी करीत असल्याच्या तक्रारी आहेतच. त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाई किंवा तडीपार करण्याबाबतचा अहवाल तयार करण्याबाबतची प्रक्रिया करावी, अशी मागणी केली. दरम्यान, सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यापारीपेठ पूर्णतः बंद होती.
Comments are closed.