श्रीष्टी येथील पुलावरील पाण्यातून बस चालवत नेऊन प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
गुरुवारी रात्री जालना हुन आष्टी कडे बस जात असताना दरम्यान कठड्यांचा अंदाज न आल्यानं बस थेट पुलाच्या खाली पाण्यात कोसळली होती यामध्ये एकूण 23 प्रवाशी प्रवास करत होते मात्र गावकऱ्यांनि सर्व प्रवासी हे सुखरुप बाहेर काढले होते,व नंतर पोलीस व प्रशासनाने येऊन क्रेन च्या सहाय्याने बस बाहेर काढली होती दरम्यान रात्री उशिरा या प्रकरणी परतूर बस आगार चे डेपाे मॅनेजर डीगंबर जाधव यांनी आष्टी
पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या तक्रारीत म्हटले आहे की चालक यांनी रस्त्यावरील फुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न घेता दुर्लक्ष करून चालकाने स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस पुलावरून नेऊन बस पलटी केली आणि या घटनेची माहिती पोलीस व प्रशासनास दिली नाही व
प्रवाश्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं नाही व त्या ठिकानाहून पलायन केलं म्हणून संबंधित चालकावर कलम 279,337,427 तसेच मोटार व्हीकल एक्ट नुसार कलम 134 (अ) (ब) 177,184 प्रमाणे गुरुवारी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे हे तपास करत आहेत
परतूर प्रतिनिधी Gopal Pote
Comments are closed.